भारताचा स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट मागील महिन्यापासून चर्चेचा विषय आहे. तिने कुस्तीमध्ये अनेक विक्रम नावावर केले आहेत. आता नुकतीच झालेली पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये फायनलमध्ये जाणारी पहिली महिला ठरली आहे. तिचे वजन ५० किलो पेक्षा जास्त झाल्यामुळे तिला गोल्ड मेडल सामान्यामधून डिसक्वालिफाय करण्यात आले होते. त्याचबरोबर तिने कॉमनवेल्थ खेळ असो किंवा चॅम्पियनशिप तिने तिच्या कामगिरीने संपूर्ण जगावर राज्य केलं आहे. यंदा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु तिने केलेले विक्रम कोणते यावर एकदा नजर टाका.
यंदा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु तिने केलेले विक्रम कोणते यावर एकदा नजर टाका. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी भारतीय महिला आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या कौशल्याने दमदार कामगिरी करून जगाला चकित केले. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विनेशने जपानच्या युई सुसाकी ही तिच्या करियरमध्ये एकही सामना न गमावलेली कुस्तीपटूला पराभूत करून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनल गाठली होती. युई सुसाकी हिला पराभूत करणारी विनेश ही एकमेव महिला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग तीन सुवर्ण पदक नावावर केले आहेत. २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये सलग तीन वेळा गोल्ड मेडल भारताच्या नावावर करणारी पहिली महिला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आशियाई चॅम्पियनशिप २०२१ मध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय विनेशने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ३ रौप्य पदकेही जिंकली. एवढेच नव्हे तर २०१८ मध्ये आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक नावावर केले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये राउंड ऑफ १६, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलमध्ये टॉप १० खेळाडूंना पराभूत करून फायनल गाठणारी पहिली महिला ठरली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया