Ramadan: हजरत अलींची शहादत अन् नव्या नेत्याची घोषणा; इराणने मोज्तबा यांच्या नियुक्तीसाठी का साधला 'Laylat Al Qadr'चा मुहूर्त ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
19th Ramadan Significance Iran 2026 : इराणमध्ये (Iran) एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मोज्तबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांची देशाचे तिसरे ‘सुप्रीम लीडर’ म्हणून निवड करण्यात आली. मात्र, या राजकीय घोषणेपेक्षा चर्चा रंगली आहे ती या घोषणेच्या वेळेची. इराण सरकारने ही घोषणा करण्यासाठी रमजान महिन्याचा १९ वा दिवस का निवडला? यामागे केवळ राजकारण नसून खोलवर रुजलेली इस्लामिक श्रद्धा आणि इतिहास दडलेला आहे.
रमजान महिन्यातील शेवटच्या १० दिवसांमध्ये येणाऱ्या विषम रात्रींना (उदा. २१, २३, २५…) ‘कद्रची रात्र’ किंवा ‘शब-ए-कद्र’ म्हटले जाते. मात्र, शिया समुदायात १९ व्या रात्रीपासूनच या विशेष प्रार्थनांना सुरुवात होते. इस्लामिक श्रद्धेनुसार, या रात्री केलेली प्रार्थना अल्लाह थेट स्वीकारतो. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मोज्तबा यांच्या निवडीचे अभिनंदन करताना मुद्दाम ‘कद्रच्या पहिल्या रात्री’चा उल्लेख केला. इराणला जगाला हे दाखवायचे होते की, नवीन नेत्याची निवड ही केवळ राजकीय नसून तिला दैवी आशीर्वाद लाभलेला आहे.
Something poetic about Mujtaba Khamenei appointment today. It’s 19th Ramadan, the day when Maula Ali(a), the first imam of believers, was struck with a poisonous sword in the mosque. His son, Imam Hasan e Mujtaba(a) became the successor on this very day. Glory to Allah!!! — – (@rajaanx) March 9, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: आकाशात अग्निकहर! इराणच्या ड्रोन आर्मीला युएईने एका झटक्यात केलं उध्वस्त; पाहा ‘तो’ 40 सेकंदांचा थरारक VIDEO
१९ व्या रमजानचा दिवस शिया मुस्लिमांसाठी अत्यंत भावूक आणि महत्त्वाचा असतो. याच दिवशी सन ६६१ मध्ये, इस्लामचे चौथे खलिफा आणि पहिले इमाम, हजरत अली यांच्यावर कुफा येथील मशिदीत फजरच्या नमाजादरम्यान विषारी तलवारीने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर (२१ व्या रमजानला) ते शहीद झाले. इराणमध्ये हजरत अली यांना सर्वोच्च स्थान दिले जाते. मोज्तबा खामेनी यांची घोषणा या दिवशी करून इराणने हे सूचित केले आहे की, नवीन नेता हा हजरत अली यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा वारसदार असेल.
— 🌒 🇮🇶/🇮🇷 NEW: The office of the Supreme Leader of the Iran, Ayatollah Sayyed Ali Hosseini Khamenei. and The office of Ayatollah Sayyed Ali Al-Sistani. Announces the sighting of the crescent moon that tomorrow, February 19th, is the first day of the holy month of Ramadan pic.twitter.com/smdO9z7RWS — Observer Report (@Observer1514) February 18, 2026
credit – social media and Twitter
मोज्तबा खामेनी ५६ वर्षांचे असून त्यांनी इराक-इराण युद्धाच्या रणांगणावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांचे शिक्षण धार्मिक मदरसा (Seminary) मध्ये झाले असून त्यांना कट्टरपंथी मानले जाते. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी म्हटले आहे की, मोज्तबा यांचे नेतृत्व देशाला विकासाच्या आणि आशीर्वादाच्या मार्गावर नेईल. मात्र, अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मोज्तबा आपल्या वडिलांप्रमाणेच कठोर भूमिका घेतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: तेहरानचा नवा हुकमी एक्का! ‘राष्ट्राध्यक्ष, IRGC ते गुप्तचर यंत्रणा, इराण नवीन सर्वोच्च नेत्याच्या मागे एकवटला
विशेष म्हणजे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करण्याची धमकी दिली होती. तरीही, इराणच्या ‘असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स’ने न डगमगता पवित्र रात्रीचा मुहूर्त साधून मोज्तबा यांच्या नावाची घोषणा केली. यातून इराणने अमेरिका आणि इस्रायलला स्पष्ट संदेश दिला आहे की, आमचे नेतृत्व हे कोणाच्या दबावाखाली नाही तर आमच्या परंपरेनुसार निवडले गेले आहे. मोज्तबा आता इराणच्या राजकीय आणि धार्मिक भविष्याचे मुख्य शिल्पकार असतील.
Ans: या दिवशी हजरत अली यांच्यावर हल्ला झाला होता आणि ही शिया समुदायासाठी 'कद्रची पहिली रात्र' (अल्लाहच्या आशीर्वादाची रात्र) मानली जाते.
Ans: इराणच्या 'असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स' (८८ धर्मगुरूंची परिषद) या घटनात्मक संस्थेने मोज्तबा यांची तिसरे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली.
Ans: मोज्तबा हे धार्मिकदृष्ट्या अधिक कडक मानले जातात आणि त्यांना इराणच्या लष्करी शक्तीचा (IRGC) मोठा पाठिंबा आहे.






