शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात बाहेर जाऊन घरी आल्यानंतर अनेक लोक फ्रिजमधील थंड पाण्याचे सेवन करतात. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो आणि तहान सुद्धा कमी होते. याशिवाय या दिवसांमध्ये अनेक लोक ताक, दही, लस्सी, कोल्ड्रिंक्स, सरबत, मोजितो इत्यादींचे सेवन करतात. मात्र सतत थंड पदार्थ पिणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्यामुळे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. रेफ्रिजरेटरमधील थंडगार पाणी उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर पिऊ नये.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात फ्रिजचे थंड पाणी पीत असाल तर थांबा! जाणून घ्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम
उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठता वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. थंड पाणी पित जेवल्यास शरीरातील अन्न पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो.
फ्रिजमधील थंड गार पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयाचे ठोके कमी होऊन जातात. याशिवाय थंड पाण्याचा थेट संबंध व्हागस नर्व्हवरशी असतो. ज्यामुळे हृदयाची गती कमी होते.
जेवताना किंवा बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याचे सेवन केल्यास घसा खवखवणे, सर्दी, खोकला इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते.
थंड पाणी प्यायल्यामुळे डोकं दुखणे किंवा डोक्यात वेदना होणे इत्यादी समस्या उद्भवतात. याशिवाय थंड पाण्याचे सतत सेवन केल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो.
वाढलेले वजन कमी करताना चुकूनही थंड पाण्याचे सेवन करू नये. सतत थंड पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकते.