वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्याची, शरद पवारांची जाहीर कबूली
Sharad Pawar on Vasantdada Patil Government: मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले, त्यांनीच भूतकळ विसरून गांधी-नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला, अशी जाहीर कबुली ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ते पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात १९७८ साली काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांच काँग्रेसच सरकार पडलं आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वात पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदचा प्रयत्न झाला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा अनेकदा आरोपही कऱण्यात आला. पण आता शरद पवार यांनीच याची जाहीर कबूली देत जाहीर कबूली दिली आहे. पण याचवेळी त्यांनी वसंतदादांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
शरद पवार म्हणाले, वसंतदादा हे आमचे नेते होते. पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्हा तरूण वर्गाचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळेच आम्ही वसंतदादांचे सरकार पाडले, मी ज्या वसंतदादांचे सरकार पाडले पण पुढे जाऊन मागचे सगळे विसरून गांधी-नेहरुंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. त्यावेळचं राजकारणही वेगळं होतं. पण आताचे राजकारण बदलत चाललयं.
शरद पवार म्हणाले की, ” त्यावेळी वसंतदादा पाटील हे इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने स्वर्णसिंह काँग्रेसमध्ये होतो. पण निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि सत्ता स्थापनेसाटी प्रयत्न सुरू झाले. पण त्याला आम्हा तरूणांचा विरोध होता. त्यानंतर आम्ही एकत्र आलो, पण आमच्या दोघांमध्ये एक अंतरही होतं. त्यामुळेच आम्ही वसंतदादांचे सरकार पाडलं, त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो.
पण अवध्या १० वर्षांत आम्ही पुन्हा एकत्र आलो, त्यावेळी कुणाला मुख्यमंत्री करायचे यासाठी बैठक झाली, अनेक नावांची चर्चाही झाली, पण दादांनी सांगितलं आता बाकी कोणाच्या नावाची चर्चा करायची नाही, आज आपल्याला पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे. पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदरजे द्यायचं. म्हणजे ज्या व्यक्तीच सरकार मी पाडलं, ती व्यक्ती गांधी-नेहरूंचा विचार मजबूत करण्यासाठी आणि त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही काय केलं हे विसरून मोठ्या अंत:करणाने माझ्या मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला.
पूर्वीच राजकारण असं होत, पूर्वी मोठ्या मनाने राजकारण केलं जायचं पण आता राज्यकर्त्यांकडूनच संसदेचं कामकाज बंद पाडलं जातं, हे चित्र संसदीय लोकशाही न शोभणार आहे. ते चित्र बदलायचं असेल तर पुन्हा एकदा गांधी नेहरूंच्या विचारांची मांडणी करून देशाचा चेहरा कसा बदलेल, याची काळजी घेतली पाहिजे.
शरद पवार म्हणाले, वसंतरावांच आम्हाला मार्गदर्शन मिळायचं, ही मोठ्या मनाची माणसं, या सगळ्या लोकांचं अंतकरण फार मोठं होतं त्यांनी महाराष्ट्रात नेतृत्त्वाची फळी उभी केली.त्यामुळे गेले कित्येक वर्षे महाराष्ट्राने संपूर्ण देशात आपला लौकिक टिकवून ठेवला. राज्य चालवण्याची ताकद आणि दृष्टी असलेल्या नेतृत्त्वाची फळी ज्येष्ठ नेत्यांनी उभी केली. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलला. मला आठवतंय काँग्रेस दुभंगली. त्यात इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली. आम्ही स्वर्णसिंग काँग्रेसमध्ये होतो. यशवंतराव चव्हाण साहेब होते. त्यावेळ निवडणूक झाली पण स्पष्ट बहुमत मिळालं नाही.
इंदिरा काँग्रेसला काही जागा मिळाल्या आणि आम्हाला काही जागा मिळाल्या, शेवटी आम्ही पुन्हा एकत्र आलो. वसंतदादा मुख्यमंत्री झाले. पण आम्हा तरुणांना त्यावेळीही काँग्रेसवर राग होता. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे. त्यामुळे तिथेही आमच्यात एक अंतरहोतच. वसंतदादा हे आमचे नेते, पण त्यांनी शेवटी हे दोघे एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याला आमचा विरोध होता.
त्या विरोधात जे प्रमुख होते. त्यात मीही होतो. परिणामी एक दिवस आम्ही दादांचं सरकार पाडण्याच ठरवलं आणि आम्ही दादांच सरकार पाडलं. मी मुख्यमंत्री झालो, सत्ता माझ्या हातात आली. १० वर्षानंतर पुन्हा एकत्र येऊन राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावा यासाठी वसंतदादांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत रामराव अदिक, शिवाजीराव निलंगेकरसह अनेक नेते उपस्थित होते.नेत्यांच्या मते, त्या बैठकीत अनेक नावांची चर्चा झाली, परंतु वसंतदादांनी पक्षाचे नेतृत्व शरदकडे देण्याचे स्पष्ट केले. “ज्या व्यक्तीचा सरकार मी पाडलं, त्या व्यक्तीचा विचार गांधी-नेहरूंच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी मोठ्या अंत:करणाने आम्ही पुन्हा एकत्र आलो.”
सध्याच्या पार्लमेंटमधील परिस्थितीवर बोलताना, नेत्यांनी सांगितले की, “आज देशातल्या परिस्थिती वेगळी आहे. पार्लमेंटचे १४ दिवसांचे अधिवेशन सुरू आहे, पण सातत्याने कामकाज ठप्प होत आहे. सभागृहात प्रवेश करतो, सही करतो, पण आत गेल्यानंतर वाद वाढतात आणि दंगा सुरू होतो. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा उपस्थित राहावे लागते, अशी स्थिती पूर्वी कधीही नव्हती.”