जीवन जगण्यासाठी शरीराला रक्ताची आवशक्यता असते. संपूर्ण शरीरात अनेक रक्तपेशी आढळून येतात. किडनी शरीराचे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. याशिवाय रक्त शुद्ध करण्यासाठी दैनंदिन आहारात अनेक लोक वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. शरीरातील रक्त शुद्ध नसल्यास आरोग्यासंबंधित इतरही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी रक्तशुद्ध असणे आवश्यक आहे. शरीराचे रक्तशुद्ध करण्यासाठी दैनंदिन आहारात गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी फळे भाज्यांचे सेवन करू रक्त शुद्ध करावे. (फोटो सौजन्य – iStock)
रक्त शुद्ध करण्यासाठी गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
ब्रोकोलीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये विटामिन सी, कॅल्शिअम, विटामिन के, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, पोटॅशिअम, मॅगनीज, फॉस्फोरस इत्यादी अनेक घटक आढळून येतात. आहारामध्ये ब्रोकोलीचे सेवन केल्यास शरीरातील रक्त शुद्ध होईल.
दैनंदिन आहारात नियमित गाजर खावे. गाजर खाल्यामुळे शरीराला विविध पोषक तत्वे मिळतात. याशिवाय यामध्ये विटामिन ए, पोटॅशिअम, फायबर, बायोटिन, विटामिन सी, मॅगनीज, फॉस्फोरस इत्यादी घटक आढळून येतात.
आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरतात. शरीरातील रक्त शुद्ध न झाल्यास विषारी घटक शरीरात तसेच साचून राहतात, ज्यामुळे इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्त शुद्ध ठेवण्यासाठी आल्याचा चहा किंवा आल्याच्या पाण्याचे सेवन करावे.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत काहींना बीट खायला आवडत नाही. बीटचे सेवन केल्यामुळे शरीरातील रक्त वाढण्यासोबतच रक्त शुद्ध सुद्धा होते. त्यामुळे जेवणात तुम्ही बीट खाऊ शकता.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लिंबू पाणी प्यायले जाते. लिंबू पाण्यात असलेले गुणधर्म शरीरासाठी आवश्यक ठरतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास वाढलेले वजन सुद्धा कमी होईल. त्यासोबतच रक्त देखील शुद्ध राहील.