जगभरात सगळीकडे भारतीय मसाल्याना मोठी मागणी आहे. भारत हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. 100 पेक्षा जास्त प्रकारचे मसाले भारतामध्ये मिळतात. मसाल्याना भारतासह इतर देशांमध्ये सुद्धा मागणी आहे. प्रत्येक स्वयंपाक घरात मसाल्यांचे वेगवेगळे प्रकार आढळून येतात. हे मसाले जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. सर्दी खोकला झाल्यानंतर खडा मसाल्यांचा वापर करून काढा बनवला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही मसाल्यांबद्दल सांगणार आहोत, जे जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते मसाले.(फोटो सौजन्य-istock)
भारतीय मसाल्यांचे आरोग्याला होणारे फायदे
आम्लपित्त किंवा सतत ढेकर येत असतील तर हिंगाचे पाणी प्यावे. यामुळे पोटासंबंधित समस्या दूर होऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक पोट दुखीचा समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचे सेवन करावे. आल्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात.
दालचिनीचा वापर चहा किंवा जेवण बनवण्यासाठी केला जातो. दालचिनीचे सेवन केल्याने अपचन किंवा पोट फुगणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.
जिऱ्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यावे.
सेलेरीचे सेवन केल्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास बरा होतो. स्वयंपाक घरातील पदार्थ बनवण्यासाठी सेलेरीचा वापर केला जातो.