प्रत्येक स्वयंपाक घरात जसे लाल तिखट, हळद, वेलची हे मसाल्याचे पदार्थ उपलब्ध असतात. तसेच जायफळ देखील असते.दक्षिण भारतामध्ये जायफळ मोठ्या प्रमाणावर पिकवले जातात. गोडाचा कोणताही पदार्थ बनवण्यासाठी जायफळाच्या पावडरचा वापर केला जातो. मिरिस्टिका सुगंधी झाडाच्या बियांपासून जायफळ हे फळ मिळते. दक्षिण भारतासह इतर ठिकाणी जायफळ मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी जायफळ उपयुक्त आहे. आज आम्ही तुम्हाला जायफळाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-istock)
जायफळाचे आरोग्याला होणारे फायदे
जायफळमध्ये उच्च फायबर आढळून येतात, जे अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करतात. यामुळे सहज अन्न पचते.अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जायफळाचे सेवन करा.
जायफळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. अँटीऑक्सिडंट्समुळे कर्करोगाचा धोका कमी होऊन आरोग्य निरोगी राहते.
मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी जायफळाचे सेवन केले जाते. यामुळे स्मरणशक्ती मजबूत राहते आणि तणाव देखील कमी होतो.
हाडे किंवा स्नायू दुखी लागल्यास जायफळाच्या तेलाने मालिश करा. तसेच शरीरातील कोणत्याही भागात सूज आल्यानंतर जायफळ तेल लावल्यास आराम मिळेल.
त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आहारात जायफळाचे सेवन करावे. यामुळे कोणतेही व्हायरल इन्फेक्शन होत नाही. जास्त प्रमाणात जायफळाचे सेवन केल्यास झोप येण्याची शक्यता असते.