मागील अनेक दक्षकांपासून केशराच्या काड्यांचा वापर आरोग्यासाठी केला जात आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. केशरमध्ये दाहक-विरोधी, अँटीऑक्सिडंट आणि अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. मानसिक संतुलन निरोगी ठेवण्यासाठी आहारात केशरचा समावेश करावा. झोप किंवा नैराश्य जाणवू लागल्यास केशरचे दूध प्यावे. हृदय,त्वचा,केस आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केशर प्रभावी आहे. केशरचे सेवन केल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य-istock)
केशरचे आरोग्याला होणारे फायदे
डिप्रेशन किंवा झोप न येणे, तणाव इत्यादी समस्या जाणवू लागल्यास केशरचे सेवन करावे. अँटीडिप्रेसेंट गुणधर्म असलेल्या केशरचे सेवन केल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी एक ग्लास दुधात तीन ते चार काड्या केशर टाकावे. हे दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास जाणवत नाही.
लहान वयातच डोळ्यांचा त्रास जाणवू लागतो. डोळ्यांची दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी आहारात केशरचे सेवन करा. यामध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी दुधात किंवा पाण्यात केशर टाकून प्यावे. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तदाब नियंत्रणात राहतो.
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी केशरचे सेवन करावे. मासिक पाळीच्या दरम्यान होणारे मूड स्विंग, थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी केशर प्रभावी आहे.