Healthy Street Foods: रस्त्यावरचे खायचे म्हटले की सर्वात पहिले डोक्यात कुठलं पाणी असेल? स्वच्छता असेल की नाही? पोटाला काही त्रास तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तर अनेक स्ट्रीट फूड्स हे अनहेल्दी असल्याचे मानले जाते. मात्र काही स्ट्रीट फूड्स असे आहेत जे हेल्दी असून शरीराला त्याचा नक्कीच फायदा मिळतो. भुवया अजिबात उंचावू नका, आम्ही खरंच सांगतोय. अशाच काही चविष्ट आणि हेल्दी स्ट्रीट फूडबाबत आम्ही माहिती देत आहोत. डाएटिशियन सुरूची दाभोळकरने काही हेल्दी स्ट्रीट फूडबाबत सांगितले आहे, नक्की वाचा आणि तुम्हाला जर स्ट्रीट फूड खायची लहर आली असेल तर या पदार्थांचा नक्की वापर करा (फोटो सौजन्य - iStock)
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी चटपटीत स्ट्रीट फूड मिळते आणि त्याची सगळ्यांना आवड असते. मात्र हे पदार्थ अनहेल्दी मानले जातात. हेल्दी स्ट्रीट फूडमध्ये कोणत्या पदार्थाचा समावेश करावा जाणून घ्या
या यादीत रताळ्याचा पहिला क्रमांक लागतो. याला स्वीट पोटॅटो असेही म्हणतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. हे तुम्ही उकडून वा भाजून रस्त्यावर खाल्ले तरीही त्याचा स्वाद उत्तम लागतो
चना-चाट दुसऱ्या क्रमांकावर आहे. चना-चाटमध्ये झिंक, लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. स्ट्रीट फूडमध्ये तुम्ही बिनधास्त चना चाट खाऊ शकता. याची चव आणि गुण दोन्हीही शरीरासाठी उत्तम ठरते
हेल्दी स्ट्रीट फूडमध्ये भेळपुरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुरमुरे, कांदा, शेव, टोमॅटो, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, लिंबाचा रस, शेंगदाणे, भाजलेले चणे, चणाडाळ असे पदार्थ वापरतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते
रस्त्यावर अनेक ठिकाणी उकडलेल्या अंड्याचा स्टॉल दिसून येतो. स्ट्रीट फूडमध्ये याचाही समावेश आहे. उकडलेल्या अंड्यात जीवनसत्त्वे, फोलेट, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम आणि झिंक यासारखे इतर अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे तुम्ही हमखास खाऊ शकता
फ्रूट चाट हे हे चवदार तसेच आरोग्यदायी आहे. हे अनेक प्रकारच्या फळांचे मिश्रण करून बनवले जाते. फळांच्या चाटमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे तुम्ही हे ताज्या फळांचे मिश्रण नक्कीच खाऊ शकता
काकडी सर्रास ठेल्यावर तुम्हाला कापून मीठमसाला लाऊन दिली जाते. अनेकांना ही ताजी रसरशीत काकडी खायला आवडते. तुम्ही त्याचा स्वाद नक्कीच स्ट्रीट फूड म्हणून घेऊ शकता. काकडीत व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि तांबे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला पोषण मिळते