Home Remedies For Cold: बदलत्या हवामानामुळे सर्दी वा खोकला होणे हे अत्यंत सामान्य आहे. थंड आणि उष्ण हवामान, प्रदूषण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती ही यामागची कारणे असू शकतात. मात्र, यावर वारंवार औषधे घेणे योग्य नाही कारण शरीरावर त्याचा दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही कोणते घरगुती उपाय करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं याबाबत डॉ. माधव भागवत यांनी सांगितले आहे. (फोटो सौजन्य - iStock)
हिवाळा असो वा पावसाळा कोणताही ऋतू बदलला की प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींना लगेच सर्दी खोकल्याचा त्रास होतो. मात्र सर्दी-खोकल्याच्या या त्रासावर नक्की काय घरगुती उपाय करता येतील जाणून घ्या
आल्यामध्ये अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दीची लक्षणे कमी होतात. एक चमचा ताज्या आल्याचा रस काढून त्यात मध मिसळा. दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्याने घसा खवखवणे आणि कफापासून आराम मिळण्यास मदत होईल
आयुर्वेदात तुळस आणि लवंगेच्या वापराला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पाने आणि लवंग पाण्यात उकळून चहा बनवा. चवीसाठी तुम्ही त्यात थोडे मध घालू शकता. यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम तर मिळतोच पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढते
नाक बंद होण्याच्या आणि कफ जमा होण्याच्या समस्येवर वाफ घेणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. गरम पाण्यात निलगिरीचे तेल मिक्स डोक्यावर टॉवेल ठेवून वाफ घ्या. हे बंद नाक उघडण्यास आणि सर्दीची लक्षणे कमी करण्यास उपयुक्त आहे
हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. एका ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. ते शरीराला आतून उबदार ठेवते आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते
घसादुखी आणि संसर्गापासून मुक्त होण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे खूप फायदेशीर आहे. हे घशातील बॅक्टेरिया काढून टाकण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते