मुंबईच्या गिरगाव भागात असणाऱ्या रमाची चाळ परिसरात एक असा कट्टा आहे. जे दिवसा आणि रात्री सारखेच भासते. पण त्या कट्ट्यामध्ये असे काही दडले आहे की लोकांचे अस्तित्व संपवू शकते. मुंबई दिवसा आणि रात्री सारखीच दिसते, पण असे पूर्णतः लागू होणार नाही. कारण येथे काही अशी ठिकाणेही आहेत, जेथील गोष्टी फार भयाण आहेत.
गिरगावमध्ये असलेला तो भयाण कट्टा! (फोटो सौजन्य - Social Media)
गिरगाव येथे असणारा जगन्नाथ कट्टा तेथील भागात फार प्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध आहेत येथे घडलेल्या काही भयाण घटनांमुळे!
मुळात, कातळाने बनलेला हा कट्टा आहे आणि असे म्हंटले जाते की हा कट्टा या चाळीच्या राखणदाराचा आहे.
या कट्ट्याचे बांधकाम सुरु होते. दरम्यान, ज्या-ज्या कारागिराने या कट्ट्याला हलवण्याचा प्रयत्न केला. त्याचा मृत्यू झाला.
असे एकदा नाही तर अनेकदा घडले आहे. त्यामुळे या कट्ट्याला न हलवता अगदी बाजूबाजूने टाईल्स बसवण्यात आले आहेत.
येथे सकाळ-संध्याकाळ माणसं बसलेली असतात, पण काही त्रास होत नाही.