भारतातात अनेक मोठमोठे किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचा एक अनोखा इतिहास आहे. भर तापत्या उन्हात, या किल्ल्यांमध्ये शौर्याची गाथा पेटते. पण सूर्य मावळताच येथे सावल्यांचा खेळ सुरु होतो. येथील अनेक किल्ले तर बंदच ठेवले जातात.
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील सर्वात भुताटकी किल्ला म्हणून ओळखला जाणारा भानगड किल्ला जयपूर आणि अलवर यांच्या मधोमध आहे. सूर्यास्तानंतर येथे प्रवेश बंद असतो. लोकांच्या मते, येथे एका तांत्रिकाने दिलेल्या शापामुळे किल्ला उजाड झाला.
मराठा साम्राज्याचा प्रसिद्ध किल्ला 'शनीवार वाडा' येथे रात्री "काका माला वाचवा!" असा लहान मुलाचा आक्रोश ऐकू येतो असे म्हटले जाते. या मुलाचा वध गादीच्या संघर्षात झाला होता.
मेहरानगड किल्ला, जोधपूर या विशाल किल्ल्याच्या काही भागात विचित्र आवाज आणि अचानक येणारे वारे यामुळे स्थानिक लोक याला "भुतांचा किल्ला" म्हणतात.
फिरोज शाह कोटला, दिल्ली येथील प्राचीन अवशेषांमध्ये जिन्न राहतात अशी श्रद्धा आहे. काही लोक रात्री तिथे दिवे लावतात आणि दूध व मिठाई अर्पण करतात.
गोलकोंडा किल्ला, हैदराबाद किल्ल्याच्या काही भागात रात्री पावलांचे आवाज, कुजबुज आणि प्रकाशाचे विचित्र बदल अनुभवले जातात असे पर्यटक सांगतात.