भुतांचा बेट म्हणून सर्वत्र ख्याती असणारे बेट म्हणजे इटलीचे 'पॉवेग्लीया बेट'! सुरुवातीच्या काळात या बेटावर फार काही भुताटकी नव्हती. परंतु, १६व्या शतकात जेव्हा इटलीमध्ये प्लेगचा प्रभाव वाढला, तेथून या बेटाच्या काळ्या यात्रेला सुरुवात झाली. देशभरात लाखोंच्या संख्येमध्ये प्लेगच्या रुग्णांमध्ये वाढ होत होती. प्लेग तसा पसरना रोग, अगदी कोरोनसारखा! त्यामुळे या रुग्णांना त्यावेळच्या स्थानिक शासनाने पॉवेग्लीया बेटावर नेण्याचे ठरवले.
जो येथे जातो तो कधीच परतत नाही. (फोटो सौजन्य - Social Media )
पॉवेग्लीया बेटांना एक क्वारंटाईन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. लाखोंच्या संख्येत रुग्ण होते आणि हजारोंच्या संख्येत रोज मृत्यू होता. या रुग्णांना परत मायभूमी आणणे तसे कठीण होते. त्यामुळे त्यांच्या मृत शरीराला त्या बेटावरच अग्नी देऊन संपवण्यात येत होते.
पुढे, काही वर्षांनी आणखीन एका पसरणाऱ्या आजाराने इटलीचे दार थोटावले. या आजारात मृत झालेल्या लाखो देहांना या परिसरात असेच फेकण्यात आले, जेणेकरून मुख्य भूमीवर याचा प्रभाव होऊ नये.
पाहता-पाहता हा भाग मृत शरीरांनी भरून गेला. हा बेट केवळ १८ एकर परिसराचा! २०व्या शतकात येथे मेंटल हॉस्पिटल तयार करण्यात आले.
सुरुवातीला चांगलं सुरु असताना अचानक विचित्र गोष्टी येथे घडण्यास सुरुवात झाली. मनोरुग्ण कोण? भुताचा सावट असणारा कोण? यामध्ये फरक करणे कठीण झाले होते. रात्री विचित्र आवाजं येण्यास सुरुवात झाली होती. काही डॉक्टर्स आणि रुगणांचा तर अचानक मृत्यू झाला होता.
येथून येणाऱ्या अनेक बातम्या लक्षात घेता त्याकाळच्या स्थानिक शासनाने रुग्णालय ताबडतोब बंद करून, हे बेट तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले. असे म्हणतात की येथे जो व्यक्ती गेला तो व्यक्ती एक तर परतलाच नाही अन् जरी आला तरी भयंकर अनुभवांनी त्रासला.