ऍस्ट्रोनट्सना विविध प्रयोगांसाठी तसेच रिसर्चसाठी स्पेसमध्ये पाठवले जाते. पृथीवरील वातावरण आणी तिथले वातावरण यात भरपूर फरक आहे. त्यामुळे या ऍस्ट्रोनट्सना स्पेसमध्ये बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. या अंतराळवीरांना अंतराळात थंड किंवा गरम वातावरणाला कसे तोंड द्यावे लागते? ते कसे झोपतात? आणि त्यांचयसमोर येणाऱ्या समस्या कोणत्या त्या जाणून घ्या.
नुकतीच बातमी आली आहे की, यानात काही बिघाड झाल्याने बोईंग कॅप्सूलचे दोन ऍस्ट्रोनट्स अवकाशात अनिश्चित काळासाठी अडकले आहेत. कधी परतणार याबाबत काहीही सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत आता अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. अंतराळवीरांच्या अंतराळातील जीवनाबद्दल.
अवकाशात अजूनही अनेक रहस्ये आहेत. यासाठी विज्ञान अजूनही अभ्यास करत आहे. अंतराळवीरांना त्याचसाठी अवकाशात पाठवले जाते.
अवकाशात अजूनही अनेक रहस्ये आहेत. यासाठी विज्ञान अजूनही अभ्यास करत आहे. अंतराळवीरांना त्याचसाठी अवकाशात पाठवले जाते.
ऍस्ट्रोनट्स स्पेसमध्ये स्पेस सूट घालतात. जो थंड वातावरण आणि उष्णता दोन्हीपासून संरक्षण करतो आणि ऑक्सिजन देखील प्रदान करतो.
जर आपण झोपेबद्दल बोललो तर स्पेस शिपमध्ये झोपण्याची जागा आहे. मात्र इथे बसण्यासारखे वातावरण नाही कारण इथे झिरो ग्रॅव्हिटीमुळे ऍस्ट्रोनट्सना उभेच राहावे लागते.
अंतराळवीर झोपण्यासाठी स्लीपिंग बॅग वापरतात. जेणेकरून त्यांचे संपूर्ण शरीर एकाच ठिकाणी राहते. या काळात ते उलटे झाले तरी त्यांना काहीच वाटत नाही.