जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी खूप फायद्याची बातमी घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक ठेवले असेल तर त्यामुळे तुमच्या अकाऊंटला असलेले फोटो गुगल सर्चमध्ये दिसू शकतात. पण जर तुम्हाला तुमचे इंस्टाग्राम पब्लिक ठेवल्यानंतरही प्रायव्हसी हवी असेल आणि तुमचे फोटो गुगल सर्चमध्ये दिसू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये तुम्ही काही सेटिंग करू शकता. याच सेटिंगबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमचंही Instagram अकाउंट पब्लिक आहे? मग आत्ताच करा ही सेटिंग आणि तुमचे फोटो Google Search पासून दूर ठेवा
खरंतर, कोट्यवधी लोकं इंस्टाग्राम वापरतात. म्हणूनच, युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन, कंपनी वेळोवेळी सुरक्षा आणि गोपनीयता वैशिष्ट्ये सादर करते.
अलीकडेच, कंपनीने एक फीचर लाँच केले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे फोटो गुगल सर्चवर जाण्यापासून रोखू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटमध्ये काही सेटिंग करावी लागणार आहे.
गुगल सर्चमधून इंस्टाग्रामवरील तुमचे फोटो आणि व्हिडिओ काढून टाकण्यासाठी, प्रथम तुमचे इंस्टाग्राम ओपन करा.
तुमच्या प्रोफाइलवर जा. प्रोफाइलवर दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला अकाउंट अँड प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या समोर 'Allow Public Photos And Video To Appear In Search Engine Results' हा पर्याय दिसेल. या पर्यायासमोर दिसणारा टॉगल सक्षम करा.
एकदा तुम्ही टॉगल सक्षम केले की, तुमचे फोटो आणि व्हिडिओ गुगल सर्चवर दिसणे थांबतील.