हिवाळ्यात गरमा गरम काॅफीची मजाच वेगळीच. पण नुसती काॅफी बनवून उपयोग काय? बऱ्याचदा घरात बनवलेली काॅफी आणि कॅफेच्या काॅफीमध्ये बरीच तफावत जाणवते. लोक शेकडो रुपये फक्त एका काॅफीवर घालवतात. पण विचार करा, इतक्या महागड्या किमतीची काॅफी जर तुम्हाला घरीच बनवता आली तर... एक परफेक्ट आणि टेस्टी काॅफी बनवण्यासाठी काही टिप्स फाॅलो करणे महत्त्वाचे ठरते. चला कॅफेसारखी काॅफी घरी कशी तयार करायची ते जाणून घेऊया.
घरच्या घरीच कॅफेसारखी टेस्टी कॉफी कशी बनवायची? जाणून घ्या ट्रिक

उत्तम काॅफी बनवण्यासाठी प्रथम चांगल्या दर्जाची काॅफी निवडा. एक कपमध्ये १ चमचा काॅफी आणि १.५ चमचा साखर मिसळा.

आता यात काही थेंब पाणी टाका आणि फेटून काॅफीला मलाईदार बनवा. ही काॅफी फेसाळ झाली की फेटणे थांबवा.

आता या फेसाळ काॅफीमध्ये गरम दूध टाका आणि चांगले मिसळून घ्या. थोडे घट्ट आणि गरम दूध काॅफीची चव आणखीन वाढवते.

कॉफीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात चिमूटभर कोको पावडर, दालचिनी पावडर, व्हॅनिला एसेन्स देखील घालू शकता.

दूध आणि कॉफीचे प्रमाण ८० (दूध) + २० (कॉफी) असे ठेवा, यामुळे काॅफीला एक परिपूर्ण चव मिळते.






