इंस्टाग्राम हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अॅप आहे. इंस्टाग्रामवर आपण फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यासोबतच ते स्टोरीवर देखील शेअर करू शकतो. या स्टोरीच्या मदतीने तुम्ही दिवसभरात काय काय केलं आहे, याचे अपडेट्स तुमच्या मित्रांना देऊ शकता. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वेळेची मर्यादा असते, ज्यामुळे ती तुमच्या प्रोफाइलवर फक्त 24 तासांसाठी दिसते. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मित्रांना मेन्शन करण्याचा पर्याय देखील आहे, ज्यामध्ये तुम्ही स्टोरीमधील फोटोमध्ये उपस्थित असलेल्या तुमच्या इतर मित्रांना टॅग करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: अरेच्चा! Instagram वर स्टोरी अपलोड केली आणि मित्राला मेन्शनच नाही केलं? आता हे फीचर करेल तुमची मदत
काहीवेळा असं होतं की आपण इंस्टाग्रामवर स्टोरी अपलोड करतो आणि मित्रांना मेन्शन करत राहून जातं. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्टोरी अपलोड केल्यानंतर देखील मित्रांना टॅग करू शकता.
सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाग्राम अॅप उघडा. आता ज्या स्टोरीमध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांना मेन्शन करायचं आहे ती स्टोरी ओपन करा.
नवीन अपडेटनंतर, तुम्हाला शेअर आणि हायलाइट पर्यायांसह खाली नवीन मेन्शन पर्याय दिसेल. जर तुम्ही अजूनही हे नवीन वैशिष्ट्य वापरले नसेल, तर तुम्ही ते मॅन्युअली देखील एडिट करू शकता.
यासाठी, इंस्टाग्राम स्टोरीच्या शेजारी दिसणाऱ्या तीन बिंदूंच्या आयकॉनवर क्लिक करा. पुढील स्क्रीनवर तुम्हाला अनेक पर्यायांसह Add Mention चा पर्याय दिसेल.
या पर्यायावर क्लिक करताच, तुमच्यासमोर अनेक मित्रांची यादी उघडेल. तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ज्या मित्राचा उल्लेख करायचा आहे त्याच्या समोर दिसणाऱ्या बॉक्सवर क्लिक करा.
यानंतर ADD वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा. अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या मित्रांना नंतर पोस्ट केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये टॅग करू शकाल.