अस्वस्थ जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, बहुतेक लोक खराब कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहेत. वाईट कोलेस्टेरॉल हे मेणासारखे असते जे शिरांमध्ये जमा होऊ लागते ज्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो. रक्त पंप करण्यासाठी हृदयावर दबाव वाढतो. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तुम्ही रिकाम्या पोटी हे 5 रस घेऊ शकता असा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी दिला आहे. कोणते हे रस आहेत जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
सध्या अनेकांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास होतोना दिसून येतो. पण शरीरातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर घरातील काही पदार्थांचे ज्युस उत्तम ठरते
डाळिंबाच्या रसात अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. निरोगी हृदयासाठी, तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाचा रस पिऊ शकता
एका ग्लास पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस मिसळून रस बनवा. हे पाणी पिऊन वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. तुम्ही हे पाणी रिकाम्या पोटीदेखील पिऊ शकता
टोमॅटोमध्ये लायकोपीन आढळते. लायकोपीन शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते
गाजरांमध्ये फायबर आढळते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकते. बीटमध्ये नायट्रेट असते जे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकते
आवळ्याचा रस पिण्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. तुम्ही दररोज रिकाम्या पोटी आवळ्याचा रस घेऊ शकता