फॅटी लिवर म्हणजे लिवरमध्ये अतिरिक्त चरबी साठण्याची समस्या, जी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अल्कोहोलिक फॅटी लिवर मद्यपानामुळे होतो, तर नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर मद्य न पिणाऱ्यांनाही होतो. सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणे दिसत नाहीत, पण लिवर सिरोसिस, पीलिया आणि वजन घटणे यासारखे परिणाम होऊ शकतात. योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करून यावर नियंत्रण ठेवता येते.
लिवरमध्ये चरबी साठू लागल्यास त्याला फॅटी लिवर किंवा हेपेटिक स्टेटोसिस म्हणतात. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे लक्षणे दिसत नाहीत. नंतर हळू हळू याचे परिणाम दिसून येतात.
लिवर हा शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव असून, तो रक्त शुद्ध करणे, पोषक द्रव्ये प्रक्रिया करणे आणि शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकणे यासाठी महत्त्वाचा आहे.
अल्कोहोलिक फॅटी लिवर रोग (AFLD) अतिप्रमाणात मद्यपानामुळे होतो, तर नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर रोग (NAFLD) मद्य न पिणाऱ्यांमध्ये होतो. असे २ प्रकारचे आजार यात असतात.
या आजारात उलटी होणे, भूक न लागणे, थकवा, कावीळ, वजन कमी होणे, त्वचेला खाज येणे आणि पोटात पाणी साचणे ही लक्षणे असू शकतात.
लिवरमध्ये सूज येणे, लिवरचे नुकसान होणे, आणि गंभीर परिस्थितीत लिवर फेल होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक असते.