निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात सतत वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात प्रोटीन, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. याशिवाय आहारात अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थांचा समावेश करावा. यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते, याशिवाय गंभीर आजारांपासून शरीराची सुटका होते. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. साथीच्या आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ नये म्हणून आहारात अँटी-इंफ्लेमेटरी पदार्थांचा समावेश करावा. (फोटो सौजन्य – istock)
रोजच्या आहारात समावेश करा 'या' Anti-Inflammatory Food चे सेवन
रोजच्या आहारात नियमित ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीजचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते. याशिवाय बेरिजमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
भारतीय स्वयंपाक घरात हळद हा पदार्थ असतोच. हळदीचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेला दाह कमी होतो. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
दैनंदिन वापरात कोणत्याही तेलाचा वापर न करता एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. या तेलात निरोगी चरबी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
आरोग्यासाठी बदाम अतिशय गुणकारी आहेत. बदाम खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात चार किंवा पाच बदाम रात्रभर भिजत ठेवा. हे बदाम सकाळी उठल्यानंतर नियमित खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
जेवणातील पदार्थाची चव वाढण्यासाठी आहारात टोमॅटोचा वापर करावा. चवीला आंबटगोड असलेल्या टोमॅटोमध्ये अनेक गुणधर्म आढळून येतात.