शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी लिव्हर अतिशय महत्वाचे आहे. पण हल्ली लिव्हरसबंधित आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. बाहेरील तळलेले अन्न, ताणतणाव, कोल्ड्रिंक्स इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या पदार्थांच्या सेवनामुळे लिव्हरमध्ये अनावश्यक घटक साचून राहतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ नियमित खाल्यास लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. (फोटो सौजन्य – istock)
Liver detox करण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
जेवणात फोडणी देण्यासाठी लसूणचा वापर केला जातो. लसूणमध्ये असलेले अॅलिसिन आणि सेलेनियम लिव्हर मुळांपासून स्वच्छ करण्यास मदत करते. यकृतातील एंजाइम सक्रिय करून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी उपाशी पोटी अर्धा लसूण नियमित भाजून खावा.
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे अतिशय शक्तिशाली दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. तसेच नियमित हळदीचे दूध किंवा पाणी प्यायल्यामुळे यकृताच्या पेशी दुरुस्त होतात आणि नवीन पेशी तयार होतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीटरूट खायला आवडत नाही. अशावेळी बीटचा रस किंवा बीटची भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता. बीटरूटमध्ये बीटालेन्स अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात.
एवोकॅडोमध्ये ग्लूटाथिओन नावाचा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आढळून येतो. यामध्ये असलेल्या घटकांमुळे लिव्हरमध्ये वाढलेली जळजळ कमी होते. तसेच लिव्हरचे कार्य सुधारण्यास मदत होते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि आर्जिनिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यकृतातून अमोनियासारखे हानिकारक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित २ किंवा ३ अक्रोड खावेत.