रोजच्या आहारात सतत तेलकट आणि तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल तसेच साचून राहते. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी अतिशय घातक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)
नसांमध्ये साचलेले घाणरेडे कोलेस्ट्रॉल स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी वरदान मानल्या जातात. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे, बीटा-सिटोस्टेरॉल आढळून येते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होते.
सकाळी उठल्यानंतर नियमित दोन किंवा तीन अक्रोड खावेत. यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते.
सकाळच्या नाश्त्यात अनेकांना ओट्स खाण्याची सवय असते. ओट्समध्ये असलेले फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल बाहेर खेचून काढते. त्यामुळे आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी ओट्स खावेत.
भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. भेंडीतील चिकट पदार्थ, म्युसिलेज शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतो.
रोजच्या आहारात सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन आणि ट्यूना इत्यादी ओमेगा-३ फॅटी ऍसिड असलेल्या माशांचे सेवन करावे. या माशांच्या सेवनामुळे शरीरात घाण बाहेर पडून जाते.