धावपळीच्या जीवनशैलीमुळे काहीवेळा आरोग्याची काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. मात्र यामुळेच आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात सतत होणारे बदल, व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. वाढलेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरात वाढलेला लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली मेटाबॉलिज्मची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा करा समावेश
शरीराला विश्रांतीची जास्त आवश्यकता असते.त्यामुळे नियमित ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपेमुळे संपूर्ण शरीर आणि त्वचा निरोगी राहते.
उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये नारळ पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाण्याच्या सेवनामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे चयापचय संतुलित राहते.
दालचिनीच्या पाण्याचे मध टाकून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेले घटक शरीराचे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे तुम्ही तयार केलेल्या दालचिनीच्या पाण्यात मध मिक्स करून पिऊ शकता.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी जळून जाईल. यामुळे शरीराचे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत नाहीत.
शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपाशी पोटी ग्रीन टी चे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीराचे चयापचय सुधारते आणि पोट स्वच्छ होते.