भारत विरुद्ध श्रीलंका : भारताच्या संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली T२० मालिका जिंकली. आता भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. यामध्ये टीम इंडियाची कमान रोहित शर्माकडेच असणार आहे. भारताच्या संघ गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये T२० मालिका खेळला आणि विजयी झाला. यामध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. परंतु काही खेळाडूंना T२० मालिकेमध्ये संधी देण्यात आली होती, त्यातील काही खेळाडूंना एकदिवसीय मालिकेमधून वगळण्यात आले आहे. आता बीसीसीआयने सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाचे काही सरावांचे फोटो शेअर केले आहेत यामध्ये भारताचा संघ नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे.
फोटो सौजन्य - BCCI
भारताचा विकेटकिपर केएल राहुल याला बरेच महिने संघामधून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याचे पुनरागमन होणार आहे.
आयपीएल २०२४ नंतर भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यातील त्याच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांची नजर असेल.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही श्रीलंका दौऱ्यासाठी जोरदार तयारी करतानाचे फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत.
भारताचे अनुभवी खेळाडू श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेमध्ये दिसणार आहेत, यामध्ये विराट कोहलीचा समावेश आहे. त्याचबरोबर कोहली आणि गंभीर यांचा फार कमी वेळा एकत्र फोटो पाहायला मिळतो.
त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज हर्षित राणा याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय भारतीय संघामध्ये पदार्पण होणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे.
त्याचबरोबर भारतीय असिस्टंट कोच अभिषेक नायर आणि भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यामध्ये चर्चा होत आहे असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.