भारतीय संघ आता नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे, त्यासाठी भारताचा नवा कर्णधार त्याचबरोबर युवा खेळाडू देखील संघामध्ये सामील झाले आहेत. भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये २० जूनपासुन मालिकेच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताचा युवा स्टार खेळाडू अर्शदीप सिंह आता कसोटी क्रिकेटमधे पदापर्ण करणार आहे. भारताचे कोच गौतम गंभीर यांनी खेळाडूंचे स्वागत केले आहे.
भारतीय नव्या खेळाडूचे टीम इंडियाचे कोच गंभीरने केले नव्या खेळाडूंचे स्वागत. फोटो सौजन्य - BCCI TV
गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन हा भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने या सिझनमध्ये कमालीचा खेळ दाखवला आहे, त्याचबरोबर ऑरेंज कॅप देखील जिंकली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर नजर असेल. फोटो सौजन्य - BCCI TV
भारतीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल आणि संघाचा उपकर्णधार रिषभ पंत याचे देखील त्याच्या नव्या जबाबदारीसाठी स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाकडुन चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. फोटो सौजन्य - BCCI TV
करुन नायर हा 7 वर्षानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने भारतीय संघासाठी 300 नाबाद धावा केल्या आहेत. तो आता इंग्लड दौऱ्यावर कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. फोटो सौजन्य - BCCI TV
भारतीय संघामध्ये आणखी एक नवा चेहरा सामील झाला आहे, तो म्हणजेच स्पोर्ट्स तज्ञ एड्रियन ले रॉक्स हे आहेत. त्यांनी सोहम देसाई याला रिप्लेस केले आहे, त्याचे देखील गंभीरने स्वागत केले आहे. फोटो सौजन्य - BCCI TV
अर्शदीप सिंह याने एकदिवसीय क्रिकेट त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. फोटो सौजन्य - BCCI TV