भारताचा हॉकी संघ सध्या आशियाई चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारतीय हॉकी संघाचे आतापर्यत आशियाई चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पाच सामने झाले आहेत. यामध्ये भारताचा संघ सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी झाला. टीम इंडिया हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करताना देखील दिसला. आता भारताच्या संघाने १४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर आले आहेत यावर एकदा नजर टाका.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील काही फोटो - फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया
भारताचा हॉकी संघाने १४ सप्टेंबर रोजी दमदार कामगिरी करत, पाकिस्तानचा २-१ ने पराभव करून सेमीफायनलची जागा पक्की केली आहे. फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया
भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत आहे. तो २०० गोल करणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला आहे. फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया
भारताच्या संघाने पहिल्या हाल्फमध्ये १-१ अशी बरोबरी केली होती, परंतु सर्वात आधी पाकिस्तानच्या संघाने गोल केला होता. त्यानंतर भारताच्या संघाने पेनल्टी कॉर्नर मिळवून कर्णधार हरमनप्रीतने भारतासाठी सामन्यात बरोबरी केली. फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया
भारताचा संघाने सर्व सामने जिंकून गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. यामध्ये भारताच्या संघाने १५ गुण मिळवले आहेत, या स्पर्धेमध्ये सर्वात्तम परफॉर्मन्स हा भारतीय हॉकी संघाचा राहिला आहे. फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया
भारताचा संघ सेमीफायनलमध्ये कोरियाशी सामना करणार आहे, या सामन्याचे आयोजन १६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये भारताने कोरियाचा पराभव केला आहे, त्यामुळे सेमीफायनलमध्ये संघ कशी कामगिरी करतो यावर नजर असणार आहे. फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया