नागाचैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या लग्नाच्या पुर्वीच्या विधींना सुरूवात झालेली आहे. आज या कपलची मंगलस्नान आणि रथस्थापना असे दोन विधी आहेत. या विधी दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पारंपरिक समारंभावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नागा चैतन्य पुन्हा एकदा वर बनण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो अभिनेत्री शोभिता धुलिपालाला आपली वधू बनवून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाच्या लग्नाच्या पुर्वीच्या विधींचे काही खास फोटो स्वत: सोभिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Sobhita Dhulipala Glows In Golden Radiance During Mangalasnanam Ceremony For Wedding With Naga Chaitanya
सोभिताने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर हळदीचे फोटोज शेअर केलेले आहेत. अभिनेत्रीला तिच्या परिवारातील काही सदस्यांच्या उपस्थितीत हळद लावण्यात आली. दरम्यान अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोभिताने हळदीसाठी पिवळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केलेली दिसत आहे. सोन्याच्या दागिन्यांसह अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. फोटोंमध्ये ती हळदीच्या रंगात रंगलेली दिसत आहे.
अभिनेत्रीने हळदीच्या कार्यक्रमामध्ये स्टायलिश अंदाजात कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस देत खूप सुंदर फोटोशूट केले आहे. सोभिताच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत असून तिच्या फॅशनचे कौतुक करीत आहेत.
हळदी समारंभात शोभिता हात जोडून बसलेली दिसत आहे आणि तिचे कुटुंबीय अभिनेत्रीवर पाणी ओतताना दिसत आहेत. हळदीच्या कार्यक्रमात तिच्या कुटुंबीयांसह तिचे मित्रमंडळीही उपस्थित होते.
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांनी १२ ऑगस्टला गुपचूप साखरपुडा आटोपला. साखरपुड्यानंतर काही महिन्यांनंतर हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये नागाचैतन्य आणि सोभिता सप्तपदी घेणार आहेत.