घरातील किंवा इतर ठिकाणी असलेले टॉयलेट नेहमी स्वच्छ असणे आवश्यक आहे. कारण टॉयलेटमध्ये आरोग्यासाठी घातक असलेले असंख्य विषाणू असतात. त्यामुळे घरातील टॉयलेट नेहमीच स्वच्छ असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा टॉयलेट सीटवरील घाण स्वच्छ न केल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर आजार होण्याची शक्यता असते. याशिवाय टॉयलेटमध्ये येणाऱ्या वासामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू लागते. घरातील टॉयलेट स्वच्छ करताना ते ब्रश किंवा इतर कोणत्याही वस्तूने घासले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरातील टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा. (फोटो सौजन्य – iStock)
वारंवार घासण्याऐवजी 'या' टिप्स फॉलो करून स्वच्छ करा टॉयलेट
घरातील अस्वच्छ टॉयलेटमुळे घराच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे टॉयलेट आणि आजूबाजूचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवावा.
टॉयलेटमधील दुर्गंधी घालवण्यासाठी साबणाचा बारीक तुकडा टॉयलेटमध्ये टाकून ठेवा. यामुळे घरात कोणतीही घाणीची दुर्गंधी येणार नाही.
खराब झालेली टॉयलेट सीट स्वच्छ करताना ब्रशवर थोडीशी टूथपेस्ट घेऊन टॉयलेट सीटवर घासा. यामुळे पिवळे आणि काळे डाग पूर्णपणे निघून जातील आणि घरातील टॉयलेट स्वच्छ होईल.
टॉयलेट सीट स्वच्छ करताना ॲल्युमिनियम फॉईल तुकडा घेऊन त्यात बेकिंग सोडा टाका. बेकिंग सोडा पिवळे डाग घालवण्यासाठी मदत करतो. यामध्ये असलेले ऍसिडयुक्त गुणधर्म टॉयलेट सीट स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.
दुर्गंधीचा त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांचा वापर केल्यामुळे टॉयलेट सीटवरील सर्व घाण स्वच्छ होते आणि दुर्गंधी कमी होते.