टेक कंपनीने अलीकडेच स्वस्त आयफोन 17 ई लाँच केला आहे. तर गेल्यावर्षी आयफोन 17 लाँच करण्यात आला होता. स्टँडर्ड मॉडेलमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहे. तर स्वस्त मॉडेल कमी किंमतीमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. अशा परिस्थिती नक्की कोणते मॉडेल खरेदी करावे असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तुम्ही देखील हा निर्णय घेताना गोंधळला आहात का? आता आम्ही दोन्ही डिव्हाईसच्या फीचर्सची तुलना करणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

डिझाईन आणि डिस्प्ले - आयफोन 17 ई आणि आयफोन 17 या दोन्ही मॉडेल्समध्ये 6.1-इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्स 1200 निट्सपर्यंत पीक HDR ब्राइटनेसला सपोर्ट करतात. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, दोन्हीकडे एरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियम बॉडी आणि IP68 रेटिंग आहे.

प्रोसेसर आणि परफॉर्मंस - आयफोन 17 ई मध्ये नवीन A19 चिपसेट दिला आहे, जो 3nm टेक्नोलॉजीवर आधारित आहे. आयफोन 17 मध्ये A19 ची अधिक प्रगत आवृत्ती किंवा त्याहून चांगली GPU कॉन्फिगरेशन आहे, जी गेमिंग आणि हाय-एंड टास्कमध्ये थोडी चांगली कामगिरी देईल.

कॅमेरा तुलना - आयफोन 17 ई मध्ये 48MP फ्यूजन कॅमेरा, 2x ऑप्टिकल-क्वालिटी झूम, 4K डॉल्बी व्हिजन व्हिडिओ (60fps), सुधारित पोर्ट्रेट आणि डेप्थ कंट्रोल देण्यात आले आहे. आयफोन 17 मध्ये 48MP डुअल कॅमेरा सेटअप, अधिक चांगला लो-लाइट परफॉर्मंस, अॅडवांस इमेज प्रोसेसिंग, अधिक प्रो-लेवल व्हिडीओ फीचर्स दिले आहेत.

बॅटरी आणि चार्जिंग - आयफोन 17 ई मध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर iPhone 17 मध्ये मोठी बॅटरी जी 30 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅकचा दावा करते.

स्टोरेज आणि किंमत - आयफोन 17 ई च्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 64,900 रुपये आहे. आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे.






