WhatsApp वर युजर्ससाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. काही फीचर्स युजर्सची मदत करतात आणि काही फीचर्स युजर्ससाठी नवीन समस्या निर्माण करतात. असंच एक फीचर म्हणजे ऑटो डाउनलोड. मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर आपले अनेक मित्र-मैत्रिणी, कुटूंबिय जोडलेले असतात. प्रत्येकजण आपल्याला फोटो आणि व्हिडीओ सतत पाठवत असतो. हे फोटो आणि व्हिडीओ ऑटो डाउनलोड होतात आणि अनेकदा आपली डोकेदुखी ठरतात. कारण यामुळे आपल्या स्मार्टफोनचं स्टोरेज फुल होतं. तुम्ही देखील WhatsApp च्या या ऑटो डाऊनलोड फीचरला कंटाळला असाल तर ही बातमी नक्की वाचा. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp वरील फोटो आणि व्हिडीओमुळे फुल्ल झालंय स्मार्टफोनचं स्टोरेज? ही एक सेटिंग चुटकीसरशी सोडवेल तुमची समस्या
तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून WhatsApp चं ऑटो डाऊनलोड फीचर बंद करू शकता. यामुळे तुमच्या स्मार्टफोनचं स्टोरेज देखील फुल होणार नाही.
सर्वात आधी WhatsApp ओपन करा आणि सेंटिगमध्ये जा. आता तुमच्या समोर अनेक पर्याय आहेत त्यातील स्टोरेज आणि डेटा हा ऑप्शन निवडा.
येथे तुम्हाला तुम्हाला WhatsApp मध्ये वाय फायवर आणि मोबाईल डेटावर काय काय डाऊनलोड करायचं आहे, त्याचे काही ऑप्शन्स पाहायला मिळतील. येथे तुम्ही ठरवू शकता की फोटोसाठी किंवा व्हिडीओसाठी ऑटो डाऊनलोड ठेवायचं आहे की नाही.
जर तुम्हाला फोटो आणि व्हिडीओसाठी ऑटो डाऊनलोड ठेवायचं नसेल तर समोरील बॉक्समध्ये कोणतीही टीक करू नका.
याशिवाय एक दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही कोणते फोटो फोनमध्ये सेव्ह करायचे आहेत हे ठरवू शकता. यासाठी सेटिंग ओपन करा आणि चॅट्समध्ये जा.
इथे तुम्हाला मीडिया विजिबिलिटी हा ऑप्शन दिसेल तो चालू असेल तर बंद करा. आता WhatsApp मधील कोणतेही फोटो स्मार्टफोनमध्ये तुमच्या परवानगीशिवाय सेव्ह होणार नाहीत.