भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा राधिका मर्चंट हिच्यासोबत पार पडला. १२ जुलै ला त्यांचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अंबानी कुटुंबियांचे लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. राधिका मर्चंट हिच्यासह ईशा अंबानींच्या लुकचे देखील नेटकऱ्यांनी कौतुक केले. अनंत अंबानींच्या मिरवणुकीसाठी ईशाने केलेला स्टयलिश लुक अनेकांना आवडला. भावाच्या लग्नात तिने राजकुमारीसारखे कपडे घातले होते.चला तर पाहुयात ईशा अंबानींचा भावाच्या लग्नातील लुक कसा होता. (फोटो सौजन्य-instagram )
भावाच्या लग्नातील ईशा अंबानींचा राजकुमारी लुक
भावाच्या लग्नात ईशा अंबानीने अबू जानी संदीप खोसला यांनी तयार केलेला कस्टम पेस्टल पीच लेहेंगा परिधान केला होता. या लेहंग्यामध्ये ती जणू काही राजकुमारीच दिसत होती.
ईशा अंबानीने परिधान केलेल्या लेहंग्यापेक्षा जास्त तिच्या नेकलेसची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या लुकवर तिने डायमंडचा हेवी नेकलेस घातला होता. त्यावर मॅचिंग झुमके आणि मॅचिंग मांग टिक्का घातला होता.
ईशाने परिधान केलेल्या लेहंग्यामध्ये दोन रंग होते. हलका पिवळा आणि गुलाबी-पीच. तिने घातलेल्या लेहंग्याला हेवी लुक दिल्यामुळे ईशावर आणखीन उठून दिसत होता.
पेस्टल पीच लेहंग्यावर ईशाने ब्राऊन-न्यूड मेकअप केला होता तर तिने हलक्या रंगाची लिपस्टिक लावली होती.
ईशाचा संपूर्ण लुक पूर्ण करण्यासाठी तिने त्यावर मॅचिंग रिंग आणि ब्रेसलेट घातले होते. या संपूर्ण लुकमध्ये ईशा खूप सुंदर दिसत होती.