आज सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर स्वतःचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिनेत्रीचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.जर तुम्हालाही वेगळे दिसायचे असेल तर तुम्ही अभिनेत्रीचे लुक फॉलो करू शकता.
'सुंदरा सुंदरा...' जान्हवी कपूरचे स्टायलिश लुक करून दिसाल अधिक आकर्षक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जान्हवी कपूर भारतीय आणि वेस्टर्न आऊटफिट दोन्ही पोशाखांमध्ये खूपच सुंदर दिसते. जर तुम्हीही ग्लॅमरस लूकसाठी नवीन कल्पना शोधत असाल तर तुम्ही अभिनेत्रीचे हे लुक फॉलो करू शकता.
जान्हवी कपूरने नुकतेच तिच्या नवीन फोटोशूटचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने फुलांची साडी परिधान केली आहे. असा लुक तुम्ही देखील करू शकता.
जर तुम्ही पार्टीसाठी ड्रेस आयडिया शोधत असाल तर तुम्ही जान्हवी कपूरच्या लुक पाहू शकता. लाल रंगाच्या गाऊनमध्ये ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. मोकळ्या केसांसह अभिनेत्रीने स्वतःचा लुक पूर्ण केला आहे.
पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ही अभिनेत्री खूपच गोंडस दिसत आहे. यासोबतच तिने न्यूड मेकअपसह डोळ्यांचा हेवी मेकअप केला आहे. ही अभिनेत्री खूपच आकर्षित दिसत आहे.
काळ्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरची किलर स्टाईल पाहायला मिळत आहे. याशिवाय तिने उंच टाचांच्या बूटही घातल्या आहेत. याफोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
जान्हवी कपूर सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. तिने दागिनेही घातले आहेत. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसते. या ड्रेस किंवा हा लुक तुम्ही कोणत्याही समारंभात फॉलो करू शकता.