‘जुग जुग जियो’ (Jug Jugg Jeeyo) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. धर्मा प्रॉडक्शन्सने युट्यूबवर ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचा ट्रेलर (Jug Jugg Jeeyo Trailer Launch) रिलीज केला आहे. राज मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये प्रेम, रोमान्स आणि कौटुंबिक नात्यांची गुंफण पाहायला मिळणार आहे. ट्रेलरच्या लूकवरून असं दिसतं की, चित्रपटाचा स्टार कास्ट प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईडवर नेणार आहे. ‘जुग जुग जियो’ मध्ये वरुण धवन (Varun Dhavan), अनिल कपूर (Anil Kapoor), मनीष पॉल (Manish Paul), नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एक आगळावेगळा फॅमिली ड्रामा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.