दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना १० ऑगस्ट रोजी खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून टिम डेव्हिडने अर्धशतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने एक मोठा विक्रम मोडला आणि तो स्वतःच्या नावावर केला.
कागिसो रबाडाने हा अॅलन डोनाल्डचा मोठा विक्रम मोडणारा दुसरा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू. फोटो सौजन्य – X
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्या मिळाली दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांनी आता मोठा विक्रम नावावर केला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा रबाडा हा दक्षिण आफ्रिका संघाचा दुसरा खेळाडू ठरला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
त्याने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या ४४ सामन्यांमध्ये ९८ विकेट्स घेणाऱ्या अॅलन डोनाल्डचा विक्रम मोडला. आता रबाडाने ९९ विकेट्स घेऊन त्याला मागे टाकले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडीया
रबाडाने ही कामगिरी फक्त ३८ डावांमध्ये केली. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे, ज्याने ४९ सामन्यांमध्ये १२७ विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात रबाडाने ४ षटकांत २९ धावा देत २ बळी घेतले. त्याने सरासरी गोलंदाजी केली. फोटो सौजन्य - सोशल मिडीया