अभिनेत्री करीना कपूरला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे नवीन फोटोज असो वा जुने असो, सोशल मीडियावर पडताच क्षणी चाहत्यांची रांगच लागते. कॉमेंट्समध्ये तर धुरळाच उडतो आणि लाईक्स तर विचारूच नका... देशातील सगळ्यात जास्त पसंत केली जाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री करीनासाठी जगभरातील तरुण वेडे आहेत. दशके उलटली पण चाहते काही घटले नाहीत आणि जुने चाहते प्रेम करण्यात मागे हटले नाहीत.
करीना कपूरचा Trendy Newspaper Look. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री करीना कपूरने @kareenakapoorkhan या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोज शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये करीना फारच आकर्षक दिसत आहे.
करीनाचा आउटफिट आणि संपूर्ण Look अतिशय युनिक आहे. तिच्या आऊटफिटवर बातम्याच बातम्या आहेत. वर्तमानपत्रांची डिजाईन असणारा हा आउटफिट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
डोळ्यावर गॉगल आणि मागे Private जेट असा हा राजेशाही रुबाब या छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे. करीना अगदी रुबाबात बसली आहे.
अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंखाली कॅप्शनमध्ये 'Self love, Happy women’s day & hello @iifa' असे नमूद केले आहे.
कौतुकाचा पाऊस पाहण्यासाठी नेटकर्यांनो या पोस्टखाली नजर टाका. तिच्या चाहत्यांनी तर कौतुकांवर कौतुक केले आहे.