आपण महाभारत वाचताना कर्णाला सूर्यपुत्र म्हंटले जाते हे ऐकले आहे. कर्ण का सूर्यपुत्र आहे? यावर एक लेख आधीच प्रसिद्ध करण्यात आले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? कर्णाला बहिणीही होत्या. मुळात, त्या कौंतेय म्हणजेच कुंतीच्या मुली नव्हता. त्या सूर्यदेवाच्या मुली होत्या. त्या दोघींचे नाव होते: तपती आणि सावित्री.
सूर्यपुत्र कर्ण मग सूर्यकन्या कोण? (फोटो सौजन्य - Social Media)

तपती ही वयाने लहान होती तर सावित्री वयाने मोठी. तपती आणि कौरव यांचा फार मोठा संबंध आहे. तपतीसाठी वर शोधत होते. सूर्यदेवांना एक सात्विक असा पुरुष तपतीसाठी हवा होता.

संवरन राजा सूर्याची फार उपासना करत होता. सूर्यदेव तपतीला घेऊन देवलोकातून पृथ्वीवर आले होते. तेव्हा सूर्यदेव तपतीला एका पर्वतावर सोडून निघून गेले. त्याच परिवर्तावर राजा संवरनपण सूर्योपासना करत होता.

त्याने तपतीला पहिले आणि बघताच क्षणी मोहित झाला. तपतीच्या मनातही तो बसला. तेव्हा तिने त्याला घोर सूर्योपासना करण्याचे सांगितले तर त्याचे विवाह होईल.

तपतीसाठी सूर्योपासनेत राजा इतका मग्न झाला की त्याला प्रजेचेही भान राहिले नाही तेव्हा गुरु वसिष्ठांनी सूर्यदेवांना सांगितले आणि त्या दोघांचा विवाह करून दिला.

तपती आणि राजा संवरांना पुढे कुरु नावाचा पुत्र झाला आणि तिथूनच कुरुवंशाला सुरुवात झाली.






