भारतातील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो केबीसी म्हणजेच कौन बनेगा करोडपतीचा 16 वा सीझन सुरू आहे. बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपतीचं एक खास नात आहे. 2000 साली पहिल्यांदा केबीसी टेलिव्हिजनवर प्रसारित झाला. आता या शोचा 16 वा सीजन सुरु आहे. कधी प्रेक्षक म्हणून तर कधी स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. केबीसीमध्ये आपण प्रेक्षक म्हणून कसे सहभागी होऊ शकतो, यासाठी काही शुल्क आहे का, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य - pinterest)
तुम्हालाही केबीसीच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जाण्याची इच्छा आहे? अशा प्रकारे पूर्ण होईल तुमची इच्छा
केबीसीमध्ये सहभागी होण्याची अनेकांची इच्छा असते. पण स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची मोजक्याच लोकांची ही इच्छा पूर्ण होते. त्यामुळे आपण प्रेक्षक म्हणून तरी सहभागी व्हाव असं अनेकांना वाटत असतं. मात्र यासाठी काय प्रक्रिया आहे आणि त्यासाठी काही शुल्क भरावे लागेल का, हे त्यांना माहीत नाही.
केबीसीमध्ये जाण्यासाठी काही प्रक्रिया आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर असे नाही. तसेच इथे सहभागी होण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.
केबीसीमध्ये सहभागी झालेल्या प्रेक्षकांपैकी बहुकेतजण स्पर्धकांचे कुटुंबीय किंवा मित्र असतात. या लोकांव्यतिरिक्त, इतर कोणालाही शोमध्ये प्रवेश मिळणे खूप कठीण आहे.
केबीसीमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी तुम्ही केबीसीमधील स्पर्धक किंवा शोची प्रोडक्शन टीम यांच्यासोबत संपर्क करू शकता.
शोमध्ये कोण उपस्थित राहणार, हे फक्त शोची प्रोडक्शन टीम ठरवते. तुमच्या ओळखीचे कोणी या शोच्या प्रोडक्शन टीमचा भाग असल्यास तुम्ही शोमध्ये प्रेक्षक म्हणून उपस्थित राहू शकता.
तुम्हाला केबीसीमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी होण्याची इच्छा असल्यास तुम्ही चॅनलला मेल करू शकता. जर चॅनलने तुमची विनंती मान्य केली तर तुम्ही शोमध्ये जाऊ शकता.