जेव्हा जेव्हा देशात मोठा किंवा विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा अनेक दिग्गज कलाकारांना आमत्रण दिले जाते. कान्स फिल्म फेस्टिव्हलपासून ते जागतिक नेत्यांच्या बैठकींपर्यंत व्हीआयपी लोकांच्या स्वागतासाठी नेहमी रेड कार्पेट वापरला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हा कार्पेट नेहमी लाल रंगाचाच का असतो? चला या रंगाच महत्त्व आणि यामागील इतिहास जाणून घेऊया.
VIP साठी नेहमी रेड कार्पेटच का वापरले जाते? निळा, पिवळा, हिरवा रंग का नाही? जाणून घ्या यामागील कारण

४५८ ईसापूर्व लिहिलेल्या प्राचीन ग्रीक नाटकात सांगितल्याप्रमाणे राजा अगामेमनॉन ट्रोजन युद्धातून परत आला तेव्हा त्याच्यासाठी लाल गालिचा अंथरला गेला. त्यावेळा लाल गालिचा हा फक्त देवांसाठीच राखीव होता.

अनेक दाव्यांनुसार, रेड कार्पेटचा पहिला वापर हा १८२१ मध्ये झाला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेम्स मोनरो यांच्या स्वागतासाठी याचा वापर करण्यात आला होता. १९२० च्या दशकापासून, हॉलिवूड आणि फॅशन जगतात रेड कार्पेटचा वापर एक परंपरा बनली, जी आजही सुरु आहे

लाल रंग हा संपत्ती, समृद्धी आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. प्राचीन काळी लाल रंगाचे उत्पादन फार महाग होते, ज्यामुळे फक्त श्रीमंतांनाच ते परवडले जात होते. इतिहासात, लाल रंग अनेक कारणांमुळे राजेशाहीशी जोडला गेला आहे

आजच्या काळात रेड कार्पेट सेलिब्रिटिंसाठी ग्लॅमरस कार्यक्रमांचे प्रवेशद्वार म्हणून काम करते. प्रचीन काळात रेड कार्पेटचा वापर शाही सोहळ्यांसाठी केला जात होता पण आधुनिक काळात तो ग्लॅमरसचा भाग बनला

भारतात मात्र आता राष्ट्रपती भवन, लोकसभा आणि राज्यसभेतील परदेशी पाहुण्यांसाठी देखील रेड कार्पेटचा वापर केला जातो. तथापि, रेड कार्पेटची मूळ संकल्पना ही ग्रीककडून मिळालेली आहे






