जगात असे अनेक गरीब देश आहे, जेथे लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. अशा लोकांना दोन वेळेचं जेवण मिळणं देखील खूप कठीण आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असते. सुदान, काँगो या देशांसह भाराताचा देखील समावेश आहे. गरीब देशांच्या यादीमध्ये भारताचे नाव कोणत्या क्रमांकावर येतं जाणून घ्या.
गरीब देशांमध्ये भारताचं नाव कोणत्या क्रमांकावर आहे जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)

जगभरातील अनेक लोकांना दोन वेळेचं जेवण मिळणं देखील खूप कठीण आहे, यामागचं मुख्य कारण आहे गरिबी.

सुदान हा जगातील सर्वात गरीब देश मानला जातो. GDP नुसार येथील लोकांचे वार्षिक उत्पन्न केवळ 455.16 डॉलर म्हणजेच 38,196 रुपये आहे.

गरिब देशांच्या यादीत आफ्रिकन देश बुरुंडीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. बुरुंडी हा पूर्व आफ्रिकन देश आहे, जिथे तेथील लोकांचे वार्षिक उत्पन्न 915 डॉलर्स म्हणजे 76,786 आहे.

या यादीत मध्य आफ्रिकन देश रिपब्लिकचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशातील लोकांचे वार्षिक उत्पन्न1120 डॉलर्स म्हणजेच 93,996 रुपये आहे.

काँगो देश या यादित चौथ्या स्थानावर आहे. येथील लोकांचे वार्षिक उत्पन्न 1,30,099 रुपये आहे. मोझांबिकचे नाव या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. येथील लोकांचे वार्षिक उत्पन्न 1,38,498 रुपये आहे.

सर्वात गरीब देशांच्या यादीत भारत 46 व्या क्रमांकावर आहे. भारतीयांचे वार्षिक उत्पन्न 2.28 लाख रुपये आहे.






