जेव्हा आपल्या अवयवामध्ये चरबी जमा होऊ लागते, तेव्हा फॅटी लिव्हर उद्भवते. यामुळे जळजळ आणि अन्य समस्या उद्भवतात. डॉक्टरांच्या मते फॅटी लिव्हर ही खरं तर बदलत्या जीवनशैलीची समस्या आहे. सध्याच्या चुकीच्या खानपानामुळे देखील ही समस्या वाढू शकते. त्यामुळेच आपल्याला या आजाराच्या लक्षणांबाबत चांगी माहिती असणे गरजेचे आहे. तुमच्या शरीरात ही पुढील लक्षणे दिसली तर समजून जावा तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या आहे.
आजच जाणून घ्या फॅटी लिव्हरची लक्षणे (फोटो सौजन्य: Freepik)
जर तुमची त्वचा लाल सतत लाल होत असेल तर सर्वप्रथम याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांना संपर्क करा. तसेच या स्थितीमुळे त्वचेवर लाल ठिपके देखील दिसू शकतात.
जेव्हा लिव्हरचा आजार त्याच्या ऍडव्हान्स लेव्हलवर पोहोचतो तेव्हा ते कावीळचे कारण बानू शकते. यात तुमची त्वचा आणि तुमच्या डोळ्यांचा पंधरा भाग पिवळा होतो.
लिव्हरचा आजार झाल्यास त्वचेवर खाज सुटू लागते. जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात मीठ जमा होते तेव्हा असे होते. त्यावर लवकर उपचार करणे शक्य होत नाही आणि परिस्थिती सतत बिघडत जाते. म्हणूच अशावेळी डॉक्टरांना संपर्क करा.
जर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर त्याचा प्रोटीन बनवण्याच्या अवयवाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे तुमच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. परिणामी, तुमच्या लक्षात येईल की तुमचा चेहरा थोडा फुगलेला दिसतो.
फॅटी लिव्हरमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. याचा अर्थ तुमचे शरीर इन्सुलिन प्रभावीपणे वापरू शकत नाही. यामुळे तुमच्या शरीरात अतिरिक्त इन्सुलिन तयार होण्यास सुरुवात होते ज्यामुळे ॲकॅन्थोसिस निग्रिकन्सची स्थिती निर्माण होते. या स्थितीत मानेच्या पटांप्रमाणे त्वचेचा रंगही काळा होतो.