Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव
घरातील प्रत्येक व्यक्तीला गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. तांदळाची खीर, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ला इत्यादी पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रबडी मलाई टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. कमीत कमी साहित्यात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही रबडी मलाई टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा कधीच तुम्ही पदार्थाची चव विसणार नाही. रबडी किंवा मलाई खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच विकत आणली जाते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाल्यास शरीराला हानी पोहचू शकते. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी कायमच गोड पदार्थ विकत आणले जातात. पण नेहमी विकतचे पदार्थ आणण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. चला तर जाणून घेऊया रबडी मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






