लग्न म्हणजे प्रत्येक स्त्रिया आयुष्यातील अतिशय महत्वाचा दिवस असतो. हा केवळ सोहळा नसून दोन कुटुंबाना एकत्र येण्याचा सुंदर क्षण. लग्न ठरल्यानंतर दोन ते तीन महिने आधीपासून खरेदीला सुरुवात केली जाते. लग्नात दागिन्यांच्या खरेदीला खूप जास्त वेळ लागतो. कारण लुक आणि साडीला शोभून दिसतील असे सुंदर दागिने खरेदी केले जातात. लग्नातील हिरव्या चुड्यामध्ये घालण्यासाठी कायमच सोन्याच्या किंवा मोत्याच्या बांगड्या खरेदी केल्या जातात. पण त्याऐवजी तुम्ही कुंदन बांगड्या खरेदी करू शकता. कुंदन बांगड्या परिधान केल्यानंतर हात भरगच्च आणि आकर्षक वाटतात. जाणून घ्या कुंदन बांगड्यांचे हे काही लेटेस्ट पॅर्टन. (फोटो सौजन्य – pinterest)
नववधूच्या हातामध्ये शोभून दिसतील कुंदन बांगड्या!

सिंगल कुंदन बांगडी कडा सगळीकडे लोकप्रिय आहे. हिरव्या किंवा कोणत्याही रंगाच्या बांगड्या घातल्यानंतर पाठीपुढे तुम्ही कुंदन कडे घालू शकता.

पारंपरिक, इंडो-वेस्टर्न ड्रेसेस किंवा साध्या कुर्ता-पलाझोवर कुंदन बांगड्यांचा सेट घातल्यास सगळेच तुमच्याकडे पाहत राहतील. कुंदन बांगड्यांमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

लेहेंगा किंवा साडीला मॅच होईल अशा बांगड्या घालायला अनेकांना आवडते. अशावेळी तुम्ही साडीच्या रंगांच्या बांगड्या आणि डायमंड बांगड्या मिक्स करून घालू शकता.

मोती आणि नाजूक रंगीत डायमंडचे वर्क करून बनवलेल्या कुंदन बांगड्या कोणत्याही साडीवर सुंदर दिसतील. बाजारात ५०० रुपयांपासून ते अगदी ५००० रुपयांपर्यंत कुंदन बांगड्या उपलब्ध आहेत.

काचेचे वर्क करून तयार केलेल्या सुंदर बांगड्या कोणत्याही साडीवर घातल्यास हातांची शोभा वाढते आणि चार चौघांमध्ये तुम्ही आकर्षक दिसता.






