राम गोपाल वर्मांता बहुचर्चित चित्रपट लडकी ड्रॅगन गर्ल १५ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
चीनमध्ये ही चित्रपट तब्बल ४००० स्क्रिनवर एकत्र प्रदर्शित होणार आहे. काल मुंबईत आयोजीत पत्रकार परिषदेत दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ही माहिती दिली.
हा माझा आत्तापर्यंतचा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट आहे. मी माझ्या लहानपणापासून ब्रूस लीचा खूप मोठा चाहता आहे . असं त्यांनी यावेळी सांगितलं.
या चित्रपटातून पुजा भालेकर ही मराळमोळी अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
हा लव्ह ट्रॅंगल चित्रपट आहे. ज्यामध्ये तिला तिचं प्रेम आणि तिचं स्वप्न हे मिळवताना संर्घष करावा लागतो.