अनेकदा आपल्या समोर अशा काही भविष्यवाण्या येतात ज्यांची आपण कल्पनाही केली नसेल. असेच एक रिसर्च आजकाल फार चर्चेत आहे, जिथे लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने दावा केला आहे की 2099 पर्यंत हवामान बदलामुळे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. या भविष्यवाणीने संपूर्ण जग हादरले असून नक्की काय हे ते सविस्तर जाणून घेऊया.
एक चूक अन् संपुष्टात येईल हा देश! पुढील 75 वर्षात 58 लाख लोकांच्या मृत्यूची भीती, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

ही भविष्यवाणी युरोपबद्दल आहे, ज्यामध्ये पुढील 75 वर्षात तेथे सुमारे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हटले आहे. हा एक गंभीर इशारा आहे जो मानवी जीवनशैली आणि पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर आधारित आहे. काही आवश्यक पावले उचलली नाहीत तर ही भविष्यवाणी खरी ठरू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

डेली स्टार या इंग्रजी वेबसाइटमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या संशोधकांनी एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार 2015 ते 2099 दरम्यान युरोपमध्ये 58 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो

या संशोधनात हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूंचा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा प्रभाव फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही दिसून येईल

अहवालानुसार, हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त असेल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की तापमान वाढल्याने उष्णतेच्या लाटा आणि इतर नैसर्गिक आपत्ती वाढतील, ज्याचा लोकांच्या जीवनावर खोल परिणाम होईल

या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. पियरे मॅसेलॉट म्हणाले की, हा अहवाल जगाने ताबडतोब हवामान बदल आणि वाढत्या उष्णतेबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात करावी यासाठी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे

बार्सिलोना हे ठिकाण असेल जिथे उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यू होणार आहेत. यानंतर रोम, नेपल्स आणि माद्रिद येतात, जिथे हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम येत्या काळात दिसून येईल. या संशोधनात युरोपातील एकूण 854 शहरांचा समावेश करण्यात आला आहे

डॉ. पियरे मॅसेलॉट यांनी त्यांच्या संशोधनाच्या शेवटी लिहिले की, जर आपण आता यावर काम सुरू केले नाही तर 5,825,746 लोकांचा जीव गमवावा लागेल. या अहवालानुसार हा इशारा केवळ युरोपसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे






