सर्वच महिलांना ओठांवर नियमित लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावल्यामुळे ओठांच्या सौदंर्यात आणखीन वाढ होते. याशिवाय अनेक महिला ऑफिसला जाताना किंवा इतर वेळी बाहेर जाताना नियमित लिपस्टिक लावून जातात. ओठांवरील त्वचा अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे नेहमी नेहमी ओठांवर लिपस्टिक लावू नये. ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर काहीवेळा अन्नपदार्थांमधून लिपस्टिक पोटात जाते, ज्यामुळे पोटासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नियमित लिपस्टिक लावल्यामुळे ओठांवर कोणते दुष्परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
नियमित लिपस्टिक लावल्यास दिसून येतील 'हे' गंभीर दुष्परिणाम
लिपस्टिक बनवताना त्यात शिसे नावाच्या हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. हे केमिकल हळूहळू शरीरात जमा होऊ लागते, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या आणि मानसिक आरोग्यात अनेक अडथळे निर्माण होतात.
वारंवार ओठांवर लिपस्टिक लावल्यास ओठांवरील त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय काहीवेळा ओठांना भेगा पडणे, ओठ फाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
लिपस्टिक तयार करताना त्यात पॅराबेन्स, कॅडमियम आणि क्रोमियम यांसारख्या हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. लिपस्टिक लावल्यानंतर कळतनकळत ही रसायने पोटामध्ये जमा होऊ लागतात. ज्यामुळे कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो.
ओठांवर लावलेली लिपस्टिक हळूहळू पोटात जाते, ज्याचा परिणाम पचनसंस्थेवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवण्याआधी किंवा कोणताही पदार्थ खाताना लिपस्टिक काढून टाकावी.
सतत ओठांवर लिपस्टिक लावल्यास ऍलर्जी, खाज सुटणे आणि जळजळ इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोणत्याही साध्या ब्रॅण्डच्या लिपस्टिक ओठांवर लावू नये.