अनेकांना कोणतेही काम न करता पैसे कमवायची फार इच्छा असते तर काही लोकांना प्रवासालाच आपल्या मूळ उत्पन्नाचा स्रोत बनवायचा असतो. त्याच वेळी, काहींना असे वाटते की त्यांना अशी नोकरी मिळावी ज्यात अधिक काम नसावे पण सुविधा उत्कृष्ट असाव्यात आणि पैसा देखील चांगला असावा. या सर्व गोष्टी कोणत्या स्वप्नाहून कमी नाही. मात्र काय होईल जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुमची ही स्वप्नवत इच्छा सत्यात उतरू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अनोख्या जॉब वॅकेन्सीबद्दल सांगत आहोत.
व्वा! काय नोकरी आहे... 6 महिने गर्लफ्रेंडसोबत बेटावर राहा आणि 26 लाख रुपये कमवा
वास्तविक, अशी ही नोकरीची ऑफर स्कॉटलँडमध्ये आली आहे. स्कॉटलंडमधील एका बेटासाठी मॅनेजरचा शोध सुरू आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या नोकरीसाठी चांगली रक्कम दिली जाईल आणि कोणत्याही विशेष पात्रतेची आवश्यकता नाही
स्कॉटिश वाइल्डलाइफ ट्रस्ट हांडा बेटासाठी मॅनेजर शोधत आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बेटावर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला 31,000 डॉलर (26 लाखांपेक्षा जास्त) दिले जातील. ही नोकरी पहिल्या सहा महिन्यांसाठी कंत्राटावर दिली जाईल
एवढी मोठी रक्कम देण्यासोबतच या मॅनेजरला येथे घरही दिले जाणार आहे, कारण त्याला येथे राहून बेटाच्या देखभालीचे काम करावे लागणार आहे. यासोबतच, जर तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत इथे राहायचे असेल तर त्यातही काही अडचण नाही
युरोपातील सागरी पक्ष्यांच्या प्रजननाच्या दरासाठी हे बेट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या बेटावरील खडकांचे नजारे अतिशय मनमोहक आहेत आणि बोटीच्या मदतीने येथे पोहोचता येते. तथापि, कर्मचाऱ्याला दर आठवड्याला स्कोरी नावाच्या गावात कपडे धुणे, बँकिंग आणि खरेदीसाठी जावे लागते.
नोकरीच्या जाहिरातीनुसार, हांडा बेट मॅनेजरला विविध कार्यक्रम आयोजित करावे लागतील आणि स्वयंसेवकांची एक टीम मॅनेज करावी लागेल. तसेच बेटावरील वन्यजीव आणि दरवर्षी येथे भेट देणाऱ्या 8,000 पर्यटकांची देखरेख देखील करावी लागेल
बेटावर कोणीही कायमस्वरूपी राहत नसल्यामुळे, शहरी जीवनाच्या गजबजाटापासून दूर राहू इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी ही नोकरी योग्य असेल. या नोकरीसाठी कोणत्याही प्रकारच्या पात्रतेची आवश्यकता नाही परंतु सागरी आणि नैसर्गिक गोष्टींची माहिती घेतल्यास नोकरी मिळण्याची शक्यता वाढते