‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात आणि प्रत्येकाच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. आपल्या अभिनयाने तिने सर्वांचे मन जिंकून घेतलं आहे. त्याशिवाय ती आपल्या सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. वनिता साडीत असो वा मॉडर्न कपड्यात असो अगदी कम्फर्टेबली फोटो पोस्ट करताना दिसते. वनिताने नुकतेच सुंदर आणि आकर्षक अशा कॉटन साडीतील फोटो शेअर केले आहेत. कसा आहे तिचा हा लुक आपण करूया डिकोड (फोटो सौजन्य - वनिता खरात इन्स्टाग्राम)
वनिता खरात नेहमीच वेगवेगळ्या फोटोंमध्ये सुंदर आणि आकर्षक दिसते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत. कसा आहे वनिताचा लुक पाहूया
गुलाबी रंगाच्या प्रिंटेड साडीमधील वनिताच्या या फोटोजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अत्यंत साधे आणि तरीही लक्षवेधी असे तिचे हे फोटोशूट दिसून येत आहे. वनिता या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय
या साडीसह वनिताने ग्लॉसी असा मिसमॅच हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केलाय आणि तिचा हा लुक कोणत्याही घरच्या समारंभासाठी तुम्हालाही कॅरी करता येईल
वनिताने या साडीसह मिनिमल दागिने घातले असून हिरव्या बांगड्या, दोन लेअर्सचा नाजूकसा नेकलेस, कानात टॉप्स आणि नाकात नथ घालून लुक पूर्ण केलाय आणि तिच्या हास्याने या लुकला चारचाँद लावले आहेत
कपाळी चंद्रकोर लावत तिने या साडीच्या लुकमध्ये मराठमोळा टच पूर्ण केलाय. वनिताच्या चेहऱ्यातील लोभसपणा चाहत्यांना अधिक भावताना दिसून येत आहे
केसांना संपूर्ण कर्ल लुक देत तिने अत्यंत माफक मेकअप केलाय. फाऊंडेशन बेस, गुलाबी आयशॅडो, मस्कारा, आयलायनर, हायलायटर आणि ब्राऊन लिपस्टिक लावत तिने या लुकला परिपूर्णता दिली आहे
वनिताने नेहमीप्रमाणेच या साडी लुकमध्येही इंटरनेटवर सर्वांचे मन जिंकून घेतलं आहे आणि तिचा हा लुक आम्ही डिकोड केल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता