लहान मुलांसाठी दिवाळी म्हणजे सुट्टीचे दिवस. दिव्यांचा प्रकाश, अंगणातील सुंदर रांगोळी, फराळ इत्यादी अनेक गोष्टी करून दिवाळी साजरा केली जाते. दिवाळी उत्सवामध्ये सगळीकडे एक वेगळाच आनंद असतो. सुट्टीच्या दिवसांमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी लोक बाहेर फिरायला जातात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन तिथे असलेल्या सौंदर्याचा आनंद घेतला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळी सणाला महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. महाराष्ट्रातील ही ठिकाण सुंदर पिकनिक स्पॉट्स म्हणून सुद्धा ओळखली जातात. (फोटो सौजन्य – istock)
यंदाच्या दिवाळीमध्ये महाराष्ट्रातील 'या' हिल स्टेशनला नक्की द्या भेट
महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. दिवाळीनंतर महाबळेश्वराला पर्यटकांची मोठी गर्दी असते. स्ट्रॉबेरी, डोंगररांगा आणि थंडगार हवामानासाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे.
पावसाळ्याच्या थंडी एन्जॉय करण्यासाठी अनेक लोक लोणावळ्यात फिरायला जातात. लोणावळ्यात टायगर पॉईंट, भुशी धबधबा आणि स्थानिक चहाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.
टेबललँड, गुहा आणि पॉईंट्समुळे पाचगणी अतिशय प्रसिद्ध आहे. फॅमिली पिकनिकसाठी तुम्ही पाचगणीला जाऊ शकता. इथे वर्षाच्या बाराही महिने हवामान थंड असते.
समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घ्याचा असल्यास तुम्ही अलिबागमध्ये जाऊ शकता. इथे खूप जास्त समुद्रकिनारे आहेत. दिवाळीनंतर सूर्योदयाचा आनंद घेण्यासाठी लोक समुद्रकिनारी जातात.
मुंबईजवळ असलेले माथेरान गाड्यांविना शहर म्हणून ओळखले जाते. निसर्ग सौंदर्य, स्वच्छ हवा, घोडेसवारी इत्यादीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही माथेरानला जाऊ शकता.