पोलिस हवालदाराचे बँक खाते लुटले (फोटो- istockphoto)
मंगळवेढ्यात पोलिस हवालदाराचे बँक खाते लुटले
सायबर चाेरट्याकडून खात्यातील ८ लाख ४९ हजारांची रोकड लंपास
मंगळवेढ्यात उडाली मोठी खळबळ
मंगळवेढा: मंगळवेढा येथे आरटीओ ई चलनच्या नावावर एका पोलिस हवालदाराच्या बँक खात्यातून ८ लाख ४९ हजार रूपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञात हॅकर विरुध्द नागेश निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे मंगळवेढ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, निंबाळकर हे गेल्या दोन वर्षापासून मंगळवेढा पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार पदावर नोकरी करतात. तर वडिल शेती व्यवसाय करतात. वडिलांच्या शेती उत्पन्नातून येणारे पैसे त्यांच्या सेव्हींग खात्यावर होते. दि. २२ डिसेंबर रोजी निंबाळकर हे मंगळवेढ्यात असताना व्हॉटसअपवर ओळखीचे विक्रांत भोसले (रा. धायटी) यांच्या व्हॉटसअपवर एक आरटीओ ईचलन अॅप वरती पीडीएफ फाईल आली होती.
मोबाईल युजर्सनो सावधान! सायबर क्राईम युनिटचा मोठा इशारा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं
फिर्यादीने आरटीओची चलन पावती आहे, असे समजून ती ओपन केली असता समोर माहिती भरण्यासाठी इंग्रजीमध्ये नेक्स्ट असे आले. त्यावेळी त्यांनी शेवटी पे यूपीआय ५० रुपये चार्ज आल्याने ते बाहेर पडले. त्यानंतर एस.एम.एस. आले नाहीत. दि. २३ रोजी सकाळी ८.४१ वाजता मोबाईल रजिस्टेशन एसबीआय अकाऊंट असा मेसेज आला, तद्नंतर काँग्रेच्युलेशन सक्सेसफुली असा मेसेज आला. व ओटीपी नंबरही आला. त्यानंतर ११.३० वाजता खात्यामधून पैसे कट झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ सायबर हेल्पलाईनवर कॉल करुन त्यांना माहिती दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करीत आहेत. दरम्यान सायबर चोरट्यांनी चक्क पोलिस हवालदारालाच आर्थिक ‘टोपी’ घातल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल या घटनेनंतर केला जात आहे.
हे देखील वाचा: WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अॅक्सेस?
मोबाईल युजर्सनो सावधान
राष्ट्रीय सायबर गुन्हे चोरी विश्लेषण युनिटने नागरिकांना यूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग घोटाळ्यांबद्दल इशारा देणारी एक नवीन सूचना जारी केली आहे ज्यामुळे आर्थिक फसवणूक आणि खाते टेकओव्हर होतात. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या तत्वाखाली जारी करण्यात आलेला हा सल्लागार इंटरनेट प्रवेशाशिवाय सुरक्षा उपायांना बायपास करण्यासाठी गुन्हेगार मूलभूत दूरसंचार सेवांचा कसा गैरफायदा घेत आहेत यावर प्रकाश टाकतो. गुन्हेगार डिलिव्हरी एजंट म्हणून भासवत आहेत आणि बँक कॉल, ओटीपी आणि मेसेजिंग अॅप पडताळणीमध्ये अडथळा आणत आहेत.मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, भारताच्या सायबर गुन्हे युनिटने भारतीय वापरकर्त्यांना यूएसएसडी-आधारित कॉल फॉरवर्डिंग घोटाळ्यांबद्दल सतर्क केले आहे. फसवणूक करणारे डिलिव्हरी एजंट म्हणून भासवून बँक कॉल, ओटीपी आणि मेसेजिंग अॅप पडताळणीमध्ये अडथळा आणतात, वापरकर्त्यांच्या माहितीमध्ये प्रवेश मिळवतात आणि नंतर ही माहिती वापरून वापरकर्त्यांचे बँक खाते कमी करतात.






