संपूर्ण भारतामध्ये गुढी पाडवा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्वच घरांमध्ये गुढी उभारून विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य बनवून दाखवला जातो. घरी बनवले जाणारे गोड पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. गुढीपाडव्याला बनवले जाणारे पदार्थ म्हणजे चव आणि परंपरेचा एक अनोखा उदाहरण आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी घरी तुम्ही कोणते पारंपरिक पदार्थ बनवू शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुम्ही बनवलेले हे पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्की आवडतील. (फोटो सौजन्य – iStock)
गुढी पाडव्यानिमित्त घरी बनवा 'हे' चविष्ट गोड पारंपरिक पदार्थ
तांदूळ किंवा शेवयांचा वापर करून तुम्ही चविष्ट खीर बनवू शकता. पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत सणाच्या दिवशी खीर आवर्जून बनवली जाते.
गुढी पाडव्याच्या दिवशी नारळ आणि साखरेचा वापर करून लाडू बनवले जातात. नारळाचे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात. पौष्टिकतेने समृद्ध असलेले लाडू पूजेमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातात.
दुधाचा वापर करून बनवली जाणारी बासुंदी चवीला अतिशय सुंदर लागते. बासुंदी हा गोड पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो.
दही, केशर आणि साखरेचा वापर करून श्रीखंड बनवले जाते. याशिवाय श्रीखंडासोबत खाण्यासाठी पुऱ्यांचा बेत आखला जातो. जेवणाच्या ताटात जर श्रीखंड पुरी असेल तर जेवणात दोन घास जास्त जातात.
सणाच्या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळी हा पदार्थ बनवला जातो. पुरणपोळीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. गुळवणी किंवा दुधासोबत पुरणपोळी खाल्ली जाते. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी घरात नैवेद्यासाठी पुरणपोळी हा पदार्थ बनवू शकता.